मुंबई | गणपती विसर्जनाबरोबर दसऱ्याची चाहूल लागली आणि अर्थातच चाहूल लागली ती दसरा मेळाव्याची. मुंडे साहेबांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवत संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्याच जन्मस्थळी सावरगाव घाट येथे भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर वरून दिली.
भगवानगडाला शह देण्यासाठी सावरगावला भगवान बाबांचे नवे स्मारक उभे राहणार आहे. दसरा मेळाव्यात भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. चला तर जरा सांगा आत्ता भगवान बाबांच्या ह्या स्मारक स्थळाचे काय नाव असु शकते.??? तुमचा वेळ सुरू होत आहे आता आणि दसऱ्याला पाहुयातच…18/10/18 रोजी सावरगाव बीड येथे सकाळी 11 वाजता…!!!, असे पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
चला तर जरा सांगा आत्ता भगवान बाबांच्या ह्या स्मारक स्थळाचे काय नाव असु शकते.??? तुमचा वेळ सुरू होत आहे आता आणि दसऱ्याला पाहुयातच…18/10/18 रोजी सावरगाव बीड येथे सकाळी 11 वाजता…!!!
— PankajaGopinathMunde (@Pankajamunde) September 25, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.