HW News Marathi
राजकारण

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आठवलेंना पाठिंबा

मुंबई | भिमाकोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले या नेत्यांच्या भूमिकांवरून राज्यभर वादळ उठले होते. मात्र प्रचारकी उडालेला धुरळा निवळल्यानंतर दलित आणि मराठा यांच्यात वाद लावून दरी वाढविण्यापेक्षा वाद मिटवून सामाजिक एकोपा निर्माण करणे हिताचे असल्याचे केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांची समाज जोडणारी भूमिका योग्य असल्याची तरुणांना पटले आहे. त्यातून प्रबोधन झाल्याने मुंबईतील अनुशक्तीनगर येथील भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सोडून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. भारिप बहुजन महासंघ सोडून रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांची मुंबई ठाणे नाशिक आदी जिल्ह्यांतून रामदास आठवलेंच्या संविधान बंगल्यावर रांग वाढू लागली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अनुशक्तीनगर तालुका अध्यक्ष गणेश गांगुर्डे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला . यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचे आशीर्वाद घरून गणेश गांगुर्डेनी रिपाइं जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिलभाई गांगुर्डे, शिलाताई गांगुर्डे, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रमेश घोक्षे, महावीर सोनवणे,लिंबराज गायकवाड, रमाकांत शिरोळे, दिनेश शिंदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आंबेडकरी जनतेच्या हितासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे गरजेचे आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आपण कोणताही त्याग करण्यास तयार असल्याची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची भूमिका योग्य असल्यानेच आपण रिपब्लिकन पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला असल्याचे मनोगत गणेश गांगुर्डे यांनी यावेळी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जनतेच्या मनातील आग व्यक्त करण्यासाठी निवडणूक लढवतोय !

News Desk

हिंगोलीमध्ये भाजप-एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या महान संत आहेत !

News Desk
राजकारण

हाफिज सईद लढवणार निवडणुक

News Desk

मुंबई | जुलै महीन्यात पाकीस्तान मध्ये निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद हा त्याची आतंकवादी संघटना जमात उद दावाचे जवळपास २०० उमेदवार रिंगनात ऊतरवनार आहे. परंतु हाफिज सईद निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा रहाणार नाही.

हाफिज सईदची आतंकवादी संघटना जमात उद दावा मिल्‍ली मुस्‍ल‍िम लीग राजनीतिक पार्टी या नावे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. परंतु पाकीस्तान निवडणुक आयोगाने याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याची माहिती खात्री लायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे हाफीज निष्क्रिय असलेली पार्टी अल्‍लाह हू अकबर तहरीक या पार्टी कडून आपले उमेदवार रिंगनात उतरविणार असल्याची चर्चा आहे

 

Related posts

सत्तेवर लाथ कशी मारायची हे शिकवण्यासाठी शिवसेनेला गाढव दिले पाहिजे – धनंजय मुंडे

News Desk

युती झाली तर आम्ही किरीट सोमय्यांसाठी प्रचार करणार नाही !

News Desk

मोदींनी दिला जय अनुसंधानचा नारा

News Desk