HW News Marathi
राजकारण

मोदी-शहांना मोठा धक्का, एनडीएतून आणखी एक पक्ष बाहेर पडणार ?

नवी दिल्ली | मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. एनडीएतून बाहेर पडण्याच्या योग्य वेळेची आम्ही वाट पाहत आहोत, असे वक्तव्य कॉनराड संगमा यांनी केले आहे. कॉनराड संगमा आणि मोदी सरकारमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून वाद सुरु आहेत. “जर केंद्र सरकारने हे विधेयक राज्यसभेत आणले तर आम्ही तात्काळ एनडीएतून बाहेर पडू”, असा स्पष्ट इशारा संगमा यांनी दिला आहे.

कॉनराड संगमा यांनी अन्य पक्षांना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचे अपिल केले आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. “नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे राज्यसभेत मंजूर होऊ नये, यासाठी आम्ही पर्यटनशील आहोत”, असे संगम यांनी म्हटले आहे. या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकानुसार पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या सहा अल्पसंख्याक समाजांच्या मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व बहाल केले जाणार आहे. या विधेयकामुळे लोकसंख्या नियंत्रण कायद्यात मोठे बदल होणार आहेत. याचसाठी कॉनराड संगमा यांनी अन्य पक्षांना सोबत घेऊन या विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्षली डोक्यांमध्ये ‘जिहादी हवा’ भरण्याचे उद्योग सुरू, आता डोके ठेचावेच लागेल !

News Desk

“…तर मी कोणत्याही भ्रष्टाचाराला हात लावणार नाही”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी कामाला लागा !

swarit