HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

त्या भाजप उमेदवाराचे नाव ‘कुजय’ असायला हवे होते, धनंजय मुंडेंची बोचरी टीका

अहमदनगर | “गेल्या पाच वर्षात आपण राज्याला काय दिले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी का सांगू शकले नाहीत ?”, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. भाजप ही फेकू पार्टी आहे. भाजपने ६ एप्रिल ऐवजी एप्रिल फुलच्या दिवशी आपला स्थापना दिवस बदलून घ्यावा, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी यावेळी लगावला आहे. अहमदनगरमध्ये मंगळवारी (२ एप्रिल) महाआघाडीचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप, शिर्डीचे भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या प्रचार रॅलीत धनंजय मुंडे बोलत होते.

सुपूत्र आणि कुपूत्र यांतील फरक आज नगरवासियांच्या समोर आहे. इथल्या भाजप उमेदवाराचे नाव ‘कुजय’ असायला हवे होते, अशी बोचरी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. “सुपूत्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगरचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप. संग्राम आईवडिलांची आज्ञा तर पाळतातच मात्र ते इथल्या जनतेचेही आज्ञाधारक आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहात आंदोलन करून निलंबित होणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव होते. हाच लोकांप्रती खरा कळवळा आहे”, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी संग्राम जगताप यांचे तोंडभरून कौतुक केले.

“सपनोंके सौदागर मोदी वर्ध्यात येऊन भर उन्हात आश्वासनांचा पाऊस पाडून गेले. जेमतेम उपस्थिती असलेल्या या सभेने मोदींना पराभवाचे चटके दिले. महाराष्ट्रात येऊन पवार कुटुंबियांवर वाच्यता करण्यापेक्षा त्यांनी स्वप्रपंचाची जबाबदारी घ्यावी. मागच्या वेळी यांनी १५ लाखाचा जुमला फेकला, आता २० लाखांचाही फेकतील. यांचा काही नेम नाही. भाजपचा स्थापना दिन आणि मोदी दिन १ एप्रिललाच साजरा करावा. तो तुमच्या वर्तणुकीला अगदी साजेसा दिवस आहे”, अशी उपहासात्मक टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Related posts

…जेव्हा गिरीश महाजन गरबा खेळतात

News Desk

समविचारी पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे | अजित पवार

News Desk

दिवंगत हेगडेवारांवर माजी राष्ट्रपतींची स्तुती सुमन

News Desk