HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काय होतास तू काय झालास तू !, भाजपची बोचरी टीका

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. देशातील राजकीय पक्षांचा प्रचार ऐन रंगात आला आहे. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून बोचरी टीका करण्यात आली आहे. मनसेची २०१४ ची भूमिका त्याच्या परस्परविरोधी अशी २०१९ ची भूमिका यावरून भाजपकडून मनसेला लक्ष्य करण्यात आले आहे.

व्यंगचित्रातून टीका करण्याची मनसेची किंबहुना राज ठाकरेंच्याच शैलीचा वापर करून भाजपने मनसेवर निशाणा साधला आहे. २०१४ साली मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरुद्ध भूमिका घेत भाजपला आपला पाठिंबा दर्शविला होता. आता आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीला आपला पाठिंबा देऊन भाजपला पाडण्याची भाषा करत आहे. मनसेच्या या परस्पर विरोधी भूमिकेमुळे मनसेचे कार्यकर्ते नाराज असल्याचे या व्यंगचित्रात दाखविण्यात आले आहे.

Related posts

इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही !

Gauri Tilekar

पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसीमधून काँग्रेसने अजय राय यांना पुन्हा दिली उमेदवारी

News Desk

पंकजा मुंडेंना सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे |उद्धव ठाकरे

News Desk