HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राहुल गांधी हे ‘गाली गॅंग’चे अध्यक्ष, भाजपची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी

मुंबई | “काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे ‘गाली गॅंग’चे प्रमुख आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरतात. काँग्रेसकडून ‘झूठमेव जयते’च्या आधारावर कोणताही पुरावा नसताना राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर खोटे आरोप केले जात आहेत. राहुल गांधी यांनी आपली मर्यादा ओलांडली आहे”, अशी बोचरी टीका भाजपचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी केली आहे. राहुल यांच्या या वक्तव्यांचा निषेध करत काँग्रेसकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी भाजपकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

राहुल गांधी हे वारंवार विविध मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींसह भाजपवर सडकून टीका करत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून राहुल गांधींविरुद्ध हे पाऊल उचलण्यात आले आहे. “काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सर्वोच्च न्यायालयाच्या नावावर वारंवार खोटं बोलत आहेत. काँग्रेसकडून ‘झूठमेव जयते’च्या आधारावर कोणताही पुरावा नसताना राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर खोटे आरोप लावले जात आहेत”, असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितले आहे.

“आता सर्वोच्च न्यायालय देखील म्हणत आहे कि राफेल करारात घोटाळा झाला आहे. आता न्यायालयानेच सांगितले आहे कि चौकीदार चोर है. पंतप्रधान मोदींनी आता माझे खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारावे” असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर राहुल यांनीपंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्याचप्रमाणे राफेलसह अन्य अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीका करत आले आहेत.

Related posts

राम कदम बेताल वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर होत आहेत ट्रोल

News Desk

मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण या चर्चा आमच्यासाठी गौण !

News Desk

इव्हीएम मशीनचा गैरवापर होतोय, नवाब मलिकांचा आरोप  

News Desk