HW Marathi
राजकारण

भाजप सध्या ‘भारतीय विरुद्ध काश्मिरी’ असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्नात !

नवी दिल्ली | सीपीएमचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारच्या एका समितीच्या आकडेवारीचा दाखला देत मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये तब्बल १७६% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सामान्य नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूच्या संख्येत देखील ९३% वाढ झाल्याचे या आकडेवारीत स्पष्ट होत असल्याचे सीपीएमचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटले आहे.  “भाजप सध्या ‘भारतीय विरुद्ध मुस्लीम आणि भारतीय विरुद्ध काश्मिरी’ असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे”, असेही सिताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

“संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकत्र आलेला असताना भाजप मात्र आगामी निवडणुकांचा विचार करून ही एकता नष्ट करण्याचे प्रयत्न करीत आहे”, असे सिताराम येचुरी यांनी म्हटले आहे. २०१४ ते २०१८ या ४ वर्षांमध्ये दर महिन्याला ११ दहशतवाद्यांनी सीमारेषेवर घुसखोरी केल्याचे देखील या आकडेवारीत स्पष्ट होत असल्याचे सिताराम येचुरी यांनी म्हटले आहे. गेल्या काही काळात काश्मिरी तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सन २०१३ मध्ये हे प्रमाण १६ होते जे २०१८ मध्ये १६४ पर्यंत पोहोचले आहे. भाजपकडून जाणीवपूर्वक गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून कट्टर राष्ट्रवादाला खतपाणी घालण्यात येत असल्याचा आरोपही सिताराम येचुरी यांनी केला आहे.

Related posts

मुलायम यांनी २०१४ मध्ये देखील असेच विधान मनमोहन सिंग यांच्यासाठी केले होते !

News Desk

‘भीम आर्मी’च्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी देण्यास पोलिसांचा नकार

News Desk

काँग्रेसकडून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न

News Desk