HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

‘ते’ राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे !

भोपाळ | भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरु केली आहे. साध्वी प्रज्ञा, अनंत कुमार हेगडे यांच्यानंतर आता भाजप नेते अनिल सौमित्र यांनी देखील अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते’, असे वक्तव्य अनिल सौमित्र यांनी केले आहे. “ते राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे. भारतात त्यांच्यासारखे करोडो पुत्र होऊन गेले. त्यातले काही लायक होते, तर काही नालायक”, अशा मजकुराची फेसबुक पोस्ट अनिल सौमित्र यांनी केली आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे देशातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून भाजपला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागणार आहे.

एकीकडे भाजप नेत्याच्या एकावर एक सुरु असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशातील वातावरण तापलेले आहेच. त्यात आता आणखी भर पडली आहे. या संपूर्ण प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस देखील बजावली आहे. तर नुकतेच साध्वी प्रज्ञा यांनी गोडसेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देखील पंतप्रधान मोदींनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “साध्वी प्रज्ञा यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत घृणास्पद असून त्यांनी माफी मागितली असली तरीही मी त्यांना कधीही मनापासून माफ करू शकत नाही”, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, पक्ष नेतृत्त्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊन देखील भाजप नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्ये होत आहेतच.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

News Desk

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील !

News Desk

‘मी’च वरळीचा आमदार असणार !

News Desk