HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महाराष्ट्रात १ हजार जाहीर सभा

नवी दिल्ली | भाजपने उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केले आहे. महाराष्ट्रात सर्व लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते या सर्वांच्या जवळपास १ हजार सभा आणि रोड शो घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज (२९ मार्च) पत्रकार परिषदेतून दिली आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा १ एप्रिलपासून घेणार आहेत. पहिली प्रचार सभा वर्धा येथे होणार असून अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. युतीची पहिल प्रचार सभा रविवारी २४ तारखेला कोल्हापूरात प्रचारात घेण्यात आली होती. त्यांच्याही ७५ पेक्षाही अधिक सभा या राज्यात होणार आहेत.

राज्यातील या नेत्यांशिवाय राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेते राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सैय्यद शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नकवी, रमणसिंग, केशव प्रसाद मोर्य हे नेतेही राज्यातील भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत. तसेच शहर आणि तालुका पातळीवर गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भांडारी, कांताताई नलावडे हे प्रचार सभा घेणार आहेत असे केशव उपाध्ये यांनी सांगितले.

Related posts

Saradha Scam : सीबीआयकडून पी.चिदंबरम यांच्या पत्नीविरोधात आरोपपत्र दाखल

News Desk

ऍट्रॉसिटी कायद्याबाबत भाष्य करताना शिवराज सिंह चौहान यांनी काळजी घ्यावी !

News Desk

AIMIM चे अध्यक्ष ओवेसी यांनी कॉंग्रेसवर केले गंभीर आरोप

News Desk