HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : भाजपच्या माढा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटेना

आरती मोरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा तिढा अनेक दिवस सुटत नव्हता. दरम्यान, संजय शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. आता मात्र भाजपने या मतदारसंघासाठी चांगलीच कंबर कसली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव पुढे येत होते. मात्र, ते राज्यात राहण्यास इच्छुक असल्याने त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जवळपास भाजपकडून माढ्याची उमेदवारी त्यांनाच मिळणार असे जवळपास निश्चित झाले. मात्र, आज (२७ मार्च) पुन्हा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

भाजप सध्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, विजयसिंह यासाठी इच्छुक नसल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपने जर विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीसाठी ही लढाई निश्चितच अवघड असणार आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा विजयसिंह मोहिते पाटील हे मनाने भाजपमध्येच असल्याचे म्हटले होते. मंगळवारी (२६ मार्च) महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील विजयसिंह मोहिते-पाटील हे प्रत्यक्षपणे भाजपमध्ये नसले तरीही ते अप्रत्यक्षरीत्या भाजपमध्येच आहेत, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता माढ्याच्या या लढतीकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधी कारवाया थांबवा, मुफ्तींची मागणी

News Desk

फोटोसेशनवरून राहुल गांधींची मोदींवर टिका

News Desk

Shivsena Dasara Melava 2018 | सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता !

News Desk