अहमदाबाद | पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेने मंगळवारी (२६ फेब्रुवारी) पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात वायुसनेने जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. वायुसेनेच्या या कारवाईत नक्की किती दहशतवादी मारले गेले यांची अधिकृत अशी आकडेवारी समोर आलेली नाही. त्यामुळे भारताच्या एअर स्ट्राईकवर प्रश्न चिन्ह उभे केले जात आहे.
BJP President Amit Shah said over 250 terrorists were killed in the airstrike carried out by the Indian Air Force aganist JeM in Pakistan's Balakot
Read @ANI story | https://t.co/N5IwMZw5wl pic.twitter.com/2Z8d5dC2LP
— ANI Digital (@ani_digital) March 4, 2019
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी या प्रश्नांवर उत्तर देताना अशी माहिती दिली आहे की, “भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या १३ दिवसांत मोदी सरकारने पाकिस्तानवर कारवाई केली होती.” शहा हे रविवारी (३ मार्च) गुजरातमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
एअर स्ट्राईकवरील विरोधकांनी विचारलेले प्रश्न हे चेहऱ्यावर हसू येण्यासारखे असल्याचे शहा यांनी या कार्यक्रमात म्हटले. तसेच एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधी पक्ष पाकिस्तानला संधी देत आहेत. तुम्ही मोदी सरकार आणि सैन्याच्या पाठीमागे उभे राहू शकत नसाल तर कमीत कमी शांत राहा असे देखील ते म्हणाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.