HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख हरवून बसला आहे !

संगमनेर । “काँग्रेस पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधला गेला असून, स्वतःची ओळख हरवून बसला आहे”, अशी अत्यंत बोचरी टीका भाजपचे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते संगमनेर येथे बोलत होते. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष आता जोरदार प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. या प्रचारादरम्यान, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे.

“काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख हरवून बसला आहे. काँग्रेसने राज्याची धुरा त्यांच्याकडे (बाळासाहेब थोरात) सोपविली. मात्र, ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वाधिक नेते पक्ष सोडून गेले. आता किमान ते तरी पक्षात सुखी राहतील, अशी आशा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यात पक्षाची काय अवस्था झाली आहे हे त्यांनी स्वतः पाहायला हवे. पक्षाच्या या अवस्थेला जबाबदार कोण ? याचाही विचार करायला हवा”, असेही राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (९ ऑक्टोबर) संगमनेरमध्ये आपले उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारसभेला उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचाराकरिता राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. या प्रचारसभेत उद्धव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Related posts

लोकांची मने नुसती ओळखू नका; तर ती जिंकायलासुद्धा हवीत | बाळा नांदगावकर

News Desk

एवढा नामोहरम, जनतेपासून तुटलेला विरोधी पक्ष पाहिला नाही !

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk