HW News Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुकीसाठी युपीमध्ये भाजप सज्ज

नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने उत्तर प्रदेशमध्ये विषेश तयारी केल्याचे पहायला मिळत आहे. २०१४ साली उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या भाजपच्या विजयाचा दाखला देत, पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे सरकार सत्तेत येईल असा दावा करण्यात आला आहे. आगामी निवडणुकी बाबत बोलताना भाजप राज्य संघटनेचे अध्यक्ष महेंद्र नाथ पांडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणा-या भाजपा समोर कोणत्याही विरोधी पक्षाची युती टिकणार नाही.

पांडे म्हणाले, “देश मोदींबरोबर आहे, विरोधी पक्षांच्या स्वार्थी गटाबरोबर नाही. निवडणुका जितक्या जवळ येतील तसतसे लोकांना योगी आणि मोदी सरकारची विकासकामे प्रखरशाने दिसून येतील”. निवडणुकीमध्ये राम मंदीर प्रश्नांचा कितपत फायदा होईल असे विचारले असता पांडे म्हणाले, मंदीर आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्थेचा विषय आहे निवडणुकीचा मुद्दा नाही.

सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर त्वरित निर्णय घ्यावा आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा करावा असेही ते म्हणाले. यूपीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पक्षाअंतर्गत तयारी संदर्भात बोलताना पांडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आमची संगठनात्मक तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच बुथ पातळीवर देखील विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा मेळावा निमित्ताने ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार; कोण बाजी मारणार, सर्वांचे लक्ष

Aprna

जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपची खासियत !

News Desk

“हे सरकार षंड आणि नामर्दासारखे…”, संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

Aprna