HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

कोटक यांच्या प्रचारात सोमय्या सहभागी झाले तर शिवसैनिक त्यांचा प्रचार करणार नाहीत !

मुंबई | भाजप ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत. याचाच परिणाम म्हणून भाजपकडून यंदा किरीट सोमय्या यांना उमेदवारी न देता मनोज कोटक यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमय्या यांनी आपली नाराजी समाधान व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी आता आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. “जर सोमय्या मनोज कोटक यांच्या प्रचारात सहभागी झाले तर शिवसैनिक कोटक यांचा प्रचार करणार नाहीत. त्यामुळे सोमय्या यांना प्रचारापासून दूर ठेवा”, अशी भूमिका शिवसैनिकांकडून घेण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे सोमय्या यांच्या निवडणुकीचा पत्ता कट झालाच मात्र आता त्यांच्या प्रचार करण्यात देखील अडचणी येण्याची शक्यता आहे. युती झाली तरीही शिवसैनिक सोमय्या यांचा प्रचार करणार नाहीत, असे शिवसेना-भाजपची युती होण्याच्या बऱ्याच दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. शिवसेनेच्या याच रोषामुळे सोमय्या यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे म्हटले जात आहे.

Related posts

अंतराळात भारताचे सर्जिकल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’ला मोठे यश

News Desk

बेस्टच्या संपावर उद्या उच्चस्तरीय समितीची बैठक

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला मनसे शुभेच्छा !

News Desk