नवी दिल्ली | देशातील निवडणुकांचा काळ जसजसा जवळ येत आहे तसतसे देशाचे राजकारण ढवळून निघत आहे. आपल्याला अपेक्षित मतदारसंघ न मिळाल्याने नाराज होऊन आपल्या पक्षाला राम राम ठोकत दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचे प्रमाणही वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका बसला आहे. अरुणाचल प्रदेशमधील भाजपच्या २ मंत्र्यांसह १२ आमदारांनी मंगळवारी (१९ मार्च) भाजपला राम राम ठोकून मेघालायचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या नॅशनल्स पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
Arunachal Pradesh: Two sitting BJP Ministers and six sitting MLAs joined National People's Party (NPP) yesterday.
— ANI (@ANI) March 20, 2019
भाजपने गृहमंत्री कुमार वाई आणि पर्यटन मंत्री जारकार गामलीन तसेच अन्य आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये तिकीट देण्यास नकार दिल्याने त्यांनी एनपीपीमध्ये प्रवेश केला आहे. “भाजपाने केवळ खोटी आश्वासने देऊन लोकांच्या मनातून विश्वास गमावला आहे. आम्ही निवडणूक देखील लढवू आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचे सरकार देखील स्थापन करू. अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे”, असे कुमार वाई यांनी म्हटले आहे.
K Waii, Arunachal Pradesh Home Minister on joining NPP: If BJP was the right party, I'd have been working for it. BJP says that for them country is first, party second & person third but they are doing dynasty politics. This is a secular state but BJP is an anti-religion party. pic.twitter.com/bh3EKdJ5sU
— ANI (@ANI) March 20, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.