HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपने व्यक्तिगत टीका न करता आमच्याशी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे !

मुंबई | “ही निवडणूक व्यक्तिकेंद्रित न होता विकासाच्या मुद्द्यांवर आधारित झाली पाहिजे. तुम्ही (भाजपने) आमच्या जाहीरनाम्यातील योजनांवर चर्चा किंवा टीका करावी, आमच्या योजनांबाबत बोलावे, आम्ही हे करू शकतो किंवा करू शकत नाही याबाबत त्यांना काय योग्य वाटते ते सांगावे, उपाय सुचवावेत. आम्ही ते स्वीकारू. मात्र, व्यक्तिगत टीका करता कामा नये”, असे मत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना व्यक्त केले आहे. काँग्रेसने आज (४ मार्च) राज्यात आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपने काँग्रेसवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

“भाजपने व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा आमच्या जाहीरनाम्यातील ‘न्याय’सारख्या योजनांवर बोलावे. आम्ही हे करू शकतो किंवा करू शकत नाही याबाबत त्यांना काय योग्य वाटते ते सांगावे, उपाय सुचवावेत. आम्ही ते स्वीकारू”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. “पंतप्रधान मोदी वारंवार व्यक्तिगत टीका करतात. त्यांनी असे करण्यापेक्षा गेल्या ५ वर्षात काय दिवे लावले ते सांगावे. आम्हाला विकासाच्या मुद्द्यांवर आधारित निवडणूक लढवायची आहे. रोजगार, अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्हाला निवडणूक लढवायची आहे”, असेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना म्हटले आहे.

Related posts

पेट्रोल पंपांवर मोदींचा फोटो, दरवाढीचा फलकही लावा! – उद्धव ठाकरे

News Desk

मोदींच्या तामिळनाडू दौऱ्याला ट्विटरवर #GoBackModi द्वारे जोरदार विरोध

News Desk

गुगलवर राहुल गांधी सरस, अमित शहांना टाकले मागे

News Desk