HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्र भाजपच्या माध्यम प्रमुखपदी पत्रकाराची नियुक्ती

मुंबई | पत्रकार नवनाथ बन (Navnath Ban) यांची महाराष्ट्र भाजपच्या माध्यम प्रमुखपदी नियुक्ती केल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नवनाथ बन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत नागपूरात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या १५ वर्षांपासून नवनाथ बन हे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी नवनाथ बन यांनी दैनिक गावकरी, मराठवाडा नेता, स्टार माझा, एबीपी माझामध्ये काम केले आहे. यानंतर नवनाथ बन हे आता महाराष्ट्र भाजपच्या माध्यम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनाथ बन यांनी भाजपच्या माध्यम प्रमुख पदी नियुक्ती केल्याची माहिती स्वत: चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून भाजपच्या प्रसिद्ध पत्रक ट्वीट आणि व्हिडिओ ट्वीट करत माहिती दिली आहे.

नवनाथ बन यांच्या नियुक्तीनंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नवनाथ बन यांनी यांच्या भाजप प्रवेश केलेला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षप्रवेशा वेळी उपस्थितीत होते. आणि  नवनाथ बन यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इलेक्टोनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केले आहे. आणि भाजप म्हणून नवनाथ बन यांचा प्रचंड उपयोग आम्हाला होणार आहे. आणि पक्षाला खूप मोठा न्याय त्यांच्या माध्यमातून मिळेल. ही अपेक्षा नवनाथ बन यांच्याकडून आहे. मी नवनाथ बन यांना महाराष्ट्र भाजपच्या माध्यम प्रमुख या पदावर नियुक्ती करत आहे. आणि आशा करतो नवनाथ हे महाराष्ट्रभर भाजपला न्याय देतील. त्यांच्या नियुक्ती आणि निवडीबद्दल त्या खूप खूप शुभेच्छा देतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संसदेचे अधिवेशन लवकर गुंडाळणार

News Desk

अशोक चव्हाण यांना भाजपच्या ‘या’ नेत्यांनी दिली ऑफर

Aprna

फडणवीस सरकारचा कहर, दुष्काळाची पाहणी टॉर्चच्या प्रकाशात

swarit