नवी दिल्ली | देशभरात आज (१२ मे) लोकसभा निवडणुकांचा सहावा टप्पा पार पडत आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील मतदान सुरु होण्यापूर्वीच येथील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे. झारग्राम येथे भाजपच्या एका बूथ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. तर मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या पंतप्रधान मोदींविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत.
West Bengal: BJP worker Raman Singh found dead last night in Gopiballabpur, Jhargram. More details awaited. pic.twitter.com/MVAdDUOrn0
— ANI (@ANI) May 12, 2019
पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी झारग्राम येथे एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान, त्याची हत्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी भाजपचा हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच भाजपच्या आणखी २ कार्यकर्त्यांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपच्या मृत कार्यकर्त्याचे नाव रामोन सिंह असे आहे.
मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याच्या मृतदेह सापडला आहे. तर मिदनापूर येथे तृणमूल काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला असून बेल्दा येथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयावर देखील हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, टीएमसीच्या मृत कार्यकर्त्याचे नाव सुधाकर मैती असे आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.