HW News Marathi
राजकारण

मागच्या दाराने आणीबाणी आणण्याचा भाजपचा डाव आहे !

मुंबई | “मारुतीची आज ‘जात’ काढली जात आहे. अरे कशाला देवांच्या जाती काढता ? निवडणूका जवळ आल्या की यांना प्रभू रामचंद्र आठवलाच. प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? आता शिवसेना राम मंदिर बांधायला निघाली आहे. साडेचार वर्षे झोपला होतात का ?”, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला केला आहे. “आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही. परंतु, मागच्या दाराने ही आणीबाणी आणली जात आहे. हा भाजपचा डाव आहे”, असेही वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केले.

खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा पार पडली. जात, पंथ, गोत्र काढून लोकांच्या भावनांशी खेळ सुरु आहे. आज गोत्र विचारले जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का ? जाहीर केले ते देता येत नसल्याने आता हे उद्योग सुरू आहेत, असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. शहरांची नावे बदलली जात आहेत. नावे बदलून समस्या सुटणार आहे का ? नवीन शहरे करा. यातून काय साध्य केले जात आहे ? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मायावती विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत, बसपचा खुलासा

News Desk

आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही! – शरद पवार

Aprna

‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते यांच्यात आता ट्विटर वॉर

News Desk
राजकारण

हे पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाहीत !

News Desk

रत्नागिरी | “सध्या नावे बदलण्याचा जमाना आहे. आता हे पेट्रोलचेही नाव बदलणार असून ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ’ असे ठेवले तर यात नवल वाटायचे कारण नाही”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

“रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून इतिहास तज्ज्ञ शक्तीकांत दास आणला आहे. इथे इतिहास लिहायचा आहे का ? इथे देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची आहे. अक्षरश : अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे”, असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.

“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे पैसे नाहीत. परंतु, वायफाय देण्यासाठी या सरकारकडे करोडो रुपये आहेत. आता मला सांगा तुम्हाला वायफाय हवा की भाकरी ?”, असा सवाल जनतेला भुजबळ यांनी केला

Related posts

गोळी लागून पुण्यातील भाजप नगरसेवक जखमी

News Desk

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘या’ काही ठरल्या लक्षवेधी

News Desk

राज्यातील सत्तांतर प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे सर्वोच्च न्यायालय पाठविणार? सर्वांचे लक्ष

Aprna