HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकचा पुरेपूर राजकीय फायदा घेतला जात असल्याची अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने वारंवार बजावून देखील भाजपकडून आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी भारतीय जवानांचा, सर्जिकल स्ट्राईकचा वापर करत एक इलेक्ट्रॉनिक कार्ड छापण्यात आले आहे. हे कार्ड उघडल्यानंतर त्यातून पंतप्रधान मोदींचा आवाज ऐकू येतो. त्याचप्रमाणे कमळाचे चिन्ह दाबा, असे स्पष्ट आवाहन देखील यात केले गेले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात ही बाब उघड झाली आहे.

      

भाजपकडून आपल्या प्रचारासाठी दिवसाला तब्बल अशा प्रकारची ५००० इलेक्ट्रॉनिक कार्ड्स छापली जात आहेत. भारतीय जवानांचा आणि कोणत्याही लष्करी कारवाईचा वापर निवडणुकांच्या प्रचारासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये, असे भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते. तरीही भाजपने निवडणूक आयोगाचे नियम अक्षरशः पायदळी तुडवत ही इलेक्ट्रॉनिक कार्ड्स छापून सर्जिकल स्ट्राईकसारख्या लष्करी कारवाईच्या नावाखाली मते मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

Related posts

‘तिहेरी तलाक’ विधेयक आज राज्यसभेत मांडणार

News Desk

काँग्रेसला शरद पवारांसारखा मोठा वकिल लाभला आहे !

News Desk

PFB : मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर

News Desk