HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपने राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर व्यक्त केली शंका

नवी दिल्ली | “राहुल गांधी हे नक्की भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक आहेत ?”, असा सवाल भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला आहे. “२०१४ साली राहुल गांधी यांनी स्वत:ला ब्रिटिश नागरिक म्हणवून घेतले होते. आता राहुल गांधी यांनी स्वतःच सांगावे कि ते भारतीय नागरिक आहेत कि ब्रिटिश नागरिक आहेत”, असे म्हणत भाजपने थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, काँग्रेसकडून अद्याप यावर कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही.

अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी राहुल यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांचे खरे नाव राऊल विंची असून त्यांनी फसवी कागदपत्रे सादर करून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप ध्रुवलाल कौशल यांच्या वकीलांनी केला आहे. “निवडणुकांसाठी राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला त्यावेळच्या कागदपत्रांनुसार राहुल हे ब्रिटिश नागरिक असल्याचे समोर येत आहे”, असे देखील नरसिम्हा राव यांनी म्हटले आहे. राहुल हे भारतीय नागरिक आहेत किंवा नाही हे स्पष्ट करण्यासाठी राहुल गांधी यांच्या वकिलांनी निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला.

Related posts

पालघरच्या सभेत सविस्तर बोलेन | राज ठाकरे

News Desk

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

News Desk

तिहेरी तलाक विधेयक कोणत्याही धर्म किंवा समाजाविरोधात नाही !

News Desk