HW News Marathi
अर्थसंकल्प

#Budget2019 : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार काय करणार ?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या २.० चा सरकाचा पहिला अर्थसंकल्प उद्या (५ जुलै) लोकसभेत मांडला जाणार आहे. अंतरिम बजेटमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी‘ची घोषणा करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत २ हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले होते. या बजेटमध्ये मोदी सरकार प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेव्यतिरिक्त कोणती योजना आणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागेल आहे. तसेच दुष्काळ, शेतकरी आत्महत्यायासाठी किती निधी केंद्र सरकारकडून देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या योजनेचा फायदा जवळपास १२ कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. ही योजना लागू करण्यासाठी वर्षाला ७५ हजार कोटी रुपये ऐवढा खर्च येणार आहे. हा सर्व खर्च केंद्र सरकार करणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. अंतरिम गोयल यांनी आज (१ फेब्रुवारी) संसदेत सादर करताना सांगितले होते.

या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपिकांना चांगला भाव मिळत नव्हता. त्यासाठी २२ शेतपिकांच्या किमान आधारभूत किंमत दीडपटीने वाढविली होती. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय मानला गेला होता. तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला तर त्या शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजनेतर्गंत २ टक्के व्याज सवलत देण्यात येणार होते. यामुळे शतकरी वेळेत कर्जाची परतफेड करेन आणि तसे केल्यास त्यांना ३ टक्के व्याजात सवलत मिळणार असल्याचे गोयल यांनी सांगितले होते..