HW News Marathi
राजकारण

बसपऐवजी चुकून भाजपला मत दिले म्हणून चक्क स्वतःचे बोटच कापले

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने ईव्हीएम मशीनवर बसपऐवजी चुकून भाजपला मत दिले. त्यामुळे पश्चाताप होऊन या व्यक्तीने चक्क स्वतःचे बोट कापल्याची बाब समोर आली आहे. पवन सिंह असे या व्यक्तीचे तो बसपा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी (१८ एप्रिल) पार पडले. मतदान केंद्रातील तांत्रिक बिघाड आणि अन्य घोळांमुळे मतदानाचा हा दुसरा टप्पा विशेषतः चर्चेत राहिला.

पवन सिंह हे अब्दुलापूर हुलासन गावचा रहिवासी आहे. बुलंदशहर मतदारसंघातून बसपने योगेश शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. योगेश शर्मा यांच्याविरोधात भाजपने भोला सिंग यांना उमेदवारी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यात बुलंदशहर मतदारसंघासाठीचे मतदान पार पडले. बसप कार्यकर्ता असलेल्या पवन सिंह याने बसपऐवजी चुकून भाजपला मतदान केले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचा पश्चाताप झाल्याने पवन सिंह यांनी स्वतःचे बोटच कापले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीची खरेदी करताय, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या !

News Desk

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ‘या’मुळे नकारली

Aprna

“मी स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna