HW News Marathi
राजकारण

देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याबाबत अंदाज वर्तविता येऊ शकत नाही !

नवी दिल्ली | देशातील सध्याची राजकीय परिस्थिती ही संभ्रम निर्माण करणारी असल्याने देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याबाबत कोणताही अंदाज वर्तविता येऊ शकत नाही, असे वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. आम्हाला जातीयवादी किंवा केवळ हिंदूंचा भारत देश नको आहे. आम्हाला अध्यात्मिक देश हवा आहे, असे मत देखील रामदेव बाबा यांनी व्यक्त केले आहे. ते मदुराईला येथे बोलत होते.

देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील भाजपचा दारुण पराभव आणि काँग्रेसने मिळविलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांचे हे वक्तव्य सूचक ठरत आहे. मी राजकारणामध्ये फार रस घेत नाही. माझा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही आणि विरोधही नाही, असेही रामदेव बाबा यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर, ‘देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याबाबत सांगता येऊ शकत नाही’ या रामदेव बाबा यांच्या वक्तव्यातून त्यांना पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडणूक येतील कि नाही याबाबत शंका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजदंड पळवूनही सभागृह सुरु ठेवणे म्हणजे सार्वभौम सभागृहाचा अवमान । जितेंद्र आव्हाड

News Desk

…माझा न्यायदेवतेवर विश्वास! – उद्धव ठाकरे

Aprna

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी चंद्राबाबूंचे उपोषण

News Desk