HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

दक्षित मुंबईतून कोळंबकरांचा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना जाहीर पाठिंबा

मुंबई | काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. कोळंबकर यांच्या पाठिंब्याने दक्षिण मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना कोळंबकरांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज कोळंबकर यांची भेट घेतली. लवकरच कोळंबकर भाजपत प्रवेश करणार आहेत.

दक्षिण मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत आहे. महिन्याभरापूर्वीच कालिदास कोळंबकर त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या फलकावरुन चर्चेत आले होते. कोळंबकर यांच्या कार्यालयाबाहेरील फलकावरुन काँग्रेस नेत्यांचे फोटो हटवून त्यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आल्याने चर्चेत आले होते. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत.

 

Related posts

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदीला ट्विटरवरून धमकी

News Desk

फुंडकरांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा

News Desk

अनिल अंबानी मोठ्या आर्थिक संकटात, दोन कंपन्यांच्या खात्यात १९ कोटी

News Desk