HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

दोनदा मतदान करण्याचा सल्ला, भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना भोवला

नवी मुंबई | भाजप-शिवसेना महायुतीच्या ठाण्यातून राजन विचारे आणि साताऱ्यातून माथाडी नेते नरेंद्र पाटील या दोन लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढवित आहेत.  महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. तिसऱ्या टप्प्यात साताऱ्यात २३ एप्रिल रोजी मतदान करा, त्यानंतर चौथ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी नवी मुंबईत राजन विचारे यांना मतदान करा, अशी मुक्ताफळे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दिला आहे. म्हात्रे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या याविरोधात निवडणक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरखैरणे येथे रविवारी (१४ एप्रिल) आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना-भाजप युतीच्या सभेत म्हात्रे यांनी केलेल्या या वक्तव्याने खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे आणि सातारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

या प्रसंगी बोलताना मंदा म्हात्रे यांनी मुक्ताफळे उधळविण्यात आली. मात्र, चूक लक्षात येताच दोन ठिकाणी मतदान करण्याचा सल्ला सांगत असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु मंदा म्हात्रे यांच्या विधानाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऐरोली विभागाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.

Related posts

गरज पडली तर आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू !

News Desk

मधुकर कुकडेंनी घेतली शरद पवारांची भेट  

धनंजय दळवी

#MarathaReservation : ट्विटरवर मराठा आरक्षण ट्रेंडिंग

News Desk