HW Marathi
राजकारण

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी चंद्राबाबूंचे उपोषण

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न देण्याच्या सरकारच्या भूमिकेला निषेध दर्शविण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज (११ फेब्रुवारी) दिल्लीत एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मजीद मेमन हे देखील उपस्थित राहिले आहेत.

चंद्राबाबू नायडू यांनी अनेकदा आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी केली आहे. तेलगू देसम पक्षाच्या बैठकीत या उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे सोमवारी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली आहे.

मागण्या कशा पूर्ण करायच्या ते आम्ही चांगेलच जाणतो !

‘तुम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या ते आम्ही चांगलेच जाणतो. हा आंध्र प्रदेशामधील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जर आमच्या स्वाभिमानावर हल्ला झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि विशेषतः पंतप्रधानांना चेतावणी देतो की त्यांनी एकट्यावर हल्ला करणे थांबवावे’, असा थेट इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

Related posts

१०० दिवसांत मोदी सरकारपासून देशातील जनता मुक्त होईल !

News Desk

चीनविरुद्ध सारे जग हा सरकारच्या मुत्सद्देगिरीचा परिणाम !

News Desk

एक देश एक निवडणूक भारतात अशक्य | राऊत

News Desk