HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

चंद्रकांत पाटलांनी किशोर शिंदेंना दिली भाजपची ऑफर

पुणे । आगामी विधानसभा निवडणुकीकरिता सोमवारी (२१ ऑक्टोबर) राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, राज्यात काही महत्त्वाच्या, प्रतिष्ठेच्या, सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या लढती मानल्या जातात. त्यांपैकी एक लढत आहे पुण्यातील कोथरूडमधील भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील विरुद्ध मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्यातली. दरम्यान, मतदानाच्या दिवशी चंद्रकांत पाटील यांनी किशोर शिंदे यांना चक्क भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यांचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

“किशोर तुझ्यासारख्या व्यक्तीची भाजपला गरज आहे”, असे म्हणत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी किशोर शिंदे यांचे कौतुक करताना त्यांना चक्क भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. यावेळी, चंद्रकांत पाटलांचा ऑफरला नकार देत किशोर शिंदे म्हणाले, “तुमच्याकडे खूप कर्तृत्ववान लोक आहेत. तुम्ही आमच्यासोबत युती केली की मग आम्ही तुमच्यासोबत येऊ.” सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदानाच्या दिवशी चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे यांची मतदारसंघात समोरासमोर भेट झाली. यावेळी झालेल्या या दोघांच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला.

Related posts

धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम राहणार !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा | अशोक चव्हाण

News Desk

‘अर्धवट तथ्य’ असलेल्या गोष्टी सांगू नका किंवा काँग्रेस पक्षा सोडा !

rasika shinde