HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस स्वर्गीय वसंतराव नाईक यांचाही रेकॉर्ड तोडतील !

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेवरून सध्या महायुतीचे दोन मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतच मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यातच आज (३० ऑक्टोबर) विधिमंडळ नेता ठरविण्यासाठी भाजपकडून महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, भाजपची ही बैठक पार पडली असून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या विधिमंडळ नेतेपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस हे आता भाजपचे मुख्यमंत्रीपदासाठीचे अधिकृत दावेदार झाले आहेत.

नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

  • आपल्या कोणाच्याही मनामध्ये विधिमंडळ नेता म्हणून दुसरं नाव असूच शकत नाही.
  • रयतेच्या मनातले जाऊन घेऊन स्वतःहून त्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव मी विधिमंडळ नेतेपदी सुचवतो.
  • सलग ५ वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली टर्म पूर्ण केली.
  • मुख्यमंत्र्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील कोणत्याही गटाने, कोणत्याही आंदोलनाद्वारे केंद्रात जाऊन ‘हा मुख्यमंत्री बदला’ असे सांगितलेले नाही.
  • स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा ११ वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील.
  • भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष
  • राज्यात सर्वाधिक जागा मिळलेला आपला पक्ष
  • वयाचा आणि अनुभवाचा आदर आमच्याही मनात आहे. पण वस्तूस्थिती ही वस्तूस्थिती
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या राम मंदिराबाबत ११ डिसेंबरनंतर ठोस निर्णय होईल !

News Desk

उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर!

News Desk

अक्षय तृतीयेला शिबीर रद्द, आमदार पाटील यांच्या मागणीला यश

News Desk