HW News Marathi
राजकारण

चंद्रकांत पाटलांचे विठुरायाला साकडे

पंढरपूर | मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकू दे आणि दुष्काळी जनतेसाठी मोठा पाऊस दे, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठूरायाला घातले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय पूजा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडली. मागील आषाढी एकादशीवेळी मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेपासून रोखण्यात आले होते. याची सल आमच्या सगळ्यांच्या मनात होती त्यामुळे कार्तिकी एकादशीपूर्वी मराठा आरक्षण देण्याचे काम केले, असल्याचे चंद्रकात पाटील यांनी आवर्जून सांगितले.

७० वर्षात एवढे आयोग आले मात्र मराठा समाजाला कोणीच मागास ठरवले नव्हते. आम्ही मात्र पहिल्यांदाच मराठा समाजाला मागास ठरवण्यात यशस्वी झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे बुद्रुक गावच्या बाळासाहेब आणि आनंदीबाई मेंगाणे या दाम्पत्याला शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठलाला घातलेले साकडे मराठ्यांचे लक्ष वेधणारे आहे. या अधिवेशनानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळणार का ? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीएम मोदींची शेवटची ‘मन की बात’, शहीद जवानांसाठी ‘नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक’

News Desk

शिंदे गटाला मोठा दिलासा! अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार तुर्तास टळली

Aprna

“मी सगळं मान्य करेन पण…”, जितेंद्र आव्हाडांची विनयभंगाच्या आरोपानंतर पहिली प्रतिक्रिया

Aprna