HW Marathi
राजकारण

सत्तेचा माज आला असेल तर ती सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात आहे !

नाशिक | “सत्तेचा माज आला असेल तर ही सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात आहे”, असा थेट इशारा आमदार छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जाहीर सभेत दिला आहे. “देशासह राज्यात महाआणीबाणी लादली जात आहे. कायदा हातात घेतला जात असून त्यासाठी परिवर्तनाची गरज आहे”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

“माझ्यावर खोटेनाटे आरोप केले गेले. बापजाद्यांनी घेतलेल्या जमिनीची किंमती वाढल्या त्याला छगन भुजबळ जबाबदार कसा”, असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी सरकारला केला आहे.”संविधान आपलं कुराण आहे. संविधान आपलं बायबल आहे. हे संविधान जाळण्यात आले. अशा या लोकांपासून संविधान वाचविण्यासाठी तयार रहा” असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.

“मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतले. परंतु विकास कुठे आहे ? इथले सगळे प्रकल्प चोरुन नेण्यात आले. बोट प्रकल्प आणला तो यांना सुरु करता आला नाही उलट बोटी चोरीला गेल्या. कुणी चोरल्या या बोटी ? कोण आहे चोर ? याचा विचार करा”, असे छगन भुजबळ यांनी जनतेला उद्देशून म्हटले आहे.

“ओबीसींच्या मतांसाठी भाजप सरकार ७०० कोटींचा निधी जाहीर करत आहे. अरे तुमची घरी बसण्याची वेळ आली आहे, ७०० कोटी रुपये देणार कुठून ?” असा खोचक छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जाहीर सभेत केला.

Related posts

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावली

News Desk

देवाच्या कृपेने मला कोरोना झाला नाही – अनिल देशमुख

News Desk

#LokSabhaElections2019 : सुजय विखे पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

News Desk