HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिला ‘आरसा’

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राजकीय पक्ष आता विविध मार्गांचा वापर करून समोरच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेली भेट ही याचेच ताजे उदाहरण आहे. भूपेश बघेल यांनी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी चक्क भेट म्हणून आरसा पाठवला आहे.

“मी हा आरसा तुम्हाला भेट म्हणून पाठवत आहे. हा आरसा तुमच्या निवासस्थानातील अशा ठिकाणी लावा जेथून तुम्ही दिवसातून अधिक वेळा ये-जा करता. जेणेकरुन तुम्ही या आरशात स्वत:चा चेहरा पाहून तुमचा खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करु शकाल”, असे लिहीत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या ट्विटला आरशाच्या ऑनलाईन ऑर्डरची रिसिट देखील जोडली आहे.

Related posts

मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा बरखास्त करणार ?

News Desk

एमएमआरडीएचा विस्तार होणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रद्द करावा | नीलम गो-हे

News Desk