HW News Marathi
राजकारण

ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी छिंदमवर गुन्हा दाखल

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमच्या भावाने पुजाऱ्याला सोबत घेऊन अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानावेळी मतदान यंत्राची पूजा केली होती. याप्रकरणी श्रीकांत छिंदम यांनी निवडणुकीच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रविवारी(९ डिसेंबर) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तोफखाना पोलिसांनी श्रीकांत छिंदमला ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या १७ प्रभागातील एकूण ६८ जागांसाठी रविवारी (९ डिसेंबर) मतदान झाले. त्यावेळी श्रीकांत छिंदमने पुजाऱ्याला थेट मतदान केंद्रावर आणले आणि ईव्हीएमची पूजा केली. याप्रकरणी प्रशासनाने रात्री उशिरा कारवाई केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीकांत छिंदमसह ८ जणांवर तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून त्याने पालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. श्रीपाद छिंदम हा भाजपचा उपमहापौर होता. छिंदम याने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाइलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलने करण्यात आली. त्यानंतर भाजपाने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता. छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यातील सत्तांतरावर 1 नोव्हेंबरला होणार सुनावणी

Aprna

एक घोट समाधानाचा

News Desk

जनसंपर्क वाढविण्यासाठी शहांनी घेतली माधुरीची भेट

News Desk
राजकारण

निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये मोठे बदल

News Desk

नवी दिल्ली | राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मिझोरम आणि तेलंगणा या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी (११ डिसेंबर) जाहीर होणार आहेत. दरम्यान, या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणी पूर्वी निवडणूक आयोगाने काही मोठे बदल केले आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या या बदलांमुळे विधानसभांचे निवडणुकांचे निकाल विशेषतः मध्यप्रदेश विधानसभेचे निकाल लागण्यास विलंब होऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

“या निवडणुकांच्या मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यानंतर रिटर्निंग ऑफिसर जोपर्यंत त्या टप्प्याची माहिती देणारे प्रमाणपत्र जारी करीत नाहीत. तोपर्यंत मतमोजणीचा दुसरा टप्पा सुरु होऊ शकणार नाही”,असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या मागणीनंतर निवडणूक आयोगाकडून रविवारी (९ डिसेंबर) रात्री हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रमाणपत्रात विशिष्ट वेळेपर्यंत कोणत्या उमेदवाराच्या खात्यात किती मतांची नोंद झाली आहे ही माहिती असेल. मंगळवारी (११ डिसेंबर) या पाचही विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी सुरु असताना मतमोजणी सभागृहात इंटरनेटचा वापर प्रकर्षाने टाळण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरांच्या मदतीने मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाईल.

Related posts

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ शहरांचे बदलेले नाव

Aprna

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पंतप्रधान मोदींना विकली !

News Desk

लोकसभेसाठी सपा-बसपाचे जागावाटप जाहीर

News Desk