HW Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली

मुंबई | राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा महापरिनिर्वाण दिन आहे.  महापरिनिर्वाणदिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी  मुंबईतील चैत्यभूमी येथे आले आहेत. दादर येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करता यावे, म्हणून राज्यासह देशभरातून अनुयायींनी बुधवारपासूनच रीघ लावली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठच्या सुमारास चैत्यभूमी येथे जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल सी विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे  यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

मुंबईसह नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, बीड, परभणी, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, अहमदनगर अशा अनेक ठिकाणांहून अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल होत असून, दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तरेकडील काही राज्यांतील अनुयायीही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतच्या सर्वच रस्त्यांवर अनुयायींची गर्दी पाहायला मिळत आहे.

 

Related posts

#Results2018 : भाजपने जनतेचा राग समजून आत्मपरिक्षण करावे !

News Desk

जाहीरनाम्यात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश केलात तर तुम्हाला पाठिंबा देऊ !

News Desk

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महाराष्ट्रात १ हजार जाहीर सभा

News Desk