HW News Marathi
राजकारण

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; जाणून घ्या… कोणत्या मंत्र्यांना मिळाली कोणती खाते

मुंबई | शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. यात भाजपचे 9 तर शिंदे गटातील 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली होती. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. तब्बल 38 दिवसांनंतर शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज (14 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप (Cabinet Devolution) जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

 

 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार
  • सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास
  • गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  • गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादा भुसे – बंदरे व खनिकर्म
  • संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
  • सुरेश खाडे – कामगार
  • संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत – उद्योग
  • प्रा.तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार – कृषी
  • दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • अतुल सावे –  सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

संबंधित बातम्या

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा संभाव्य खातेवाटप

Related posts

मायावतींसह अखिलेश यांची शपथविधी सोहळ्याकडे पाठ

News Desk

राज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न !

News Desk

पुलवामा हल्ला हा मोदी-इम्रान खान यांचा कट, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप

News Desk