HW News Marathi
राजकारण

शिंदे गटाला ‘ढाल-तलावर’ चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

मुंबई | निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला ‘ढाल-तलावर’ चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने ‘ढाल-तलावर’ दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅडलवरून ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार….”,  असे ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाने (Shinde Group) आज (11 ऑक्टोबर) सकाळी निवडणूक आयोगाला तळपता सूर्य ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड ही तीन चिन्ह पर्याय ई-मेलद्वारे सादर करण्यात होते

मुख्यमंत्री ट्वीट ‘ढाल-तलावर’च्या चिन्ह मिळाल्यावर ट्वटी करत म्हणाले, “आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार…., सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार. बाळासाहेबांची शिवसेना. निशाणी : ढाल-तलवार.”

शिंदे गटाने ई-मेलद्वारे दिले नवे तीन पर्याय 

शिंदे गटानेन आज सकाळी निवडणूक आयोगाला तळपता सूर्य ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड ही तीन चिन्ह पर्याय ई-मेलद्वारे सादर करण्यात होते. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव निवडणूक आयोगाकडून समोवारी मिळाले होते. उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘मशाल’ समोवारी चिन्ह दिले आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिले आहे.

 

Related posts

अशोक चव्हाण २ मे रोजी नाणारच्या दौ-यावर

News Desk

“…कोठ्यावर नाचते”, संजय राऊतांची गंभीर आरोप

Aprna

मराठा समाजावर गरळ ओकणाऱ्या तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा! – नाना पटोले

Aprna