नवी दिल्ली | पश्चिम बंगालमधील सीबीआय आणि स्थानिक पोलिसांच्या वाद चव्हाट्यावर आलेला असतानाच आता हा वाद मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. रविवारी (३ फेब्रुवारी) संध्याकाळी सीबीआयकडून कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर घाप घालण्याचा प्रयत्न झाला. छापेमारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक पोलिसांनी सीबीआयला राजीव कुमार यांच्या निवास्थानाबाहेर रोखत पोलीस ठाण्यात नेले. या संपूर्ण प्रकरणामुळे मोठा ताण निर्माण झाला.
#WATCH West Bengal Chief Minister Mamata Banerjee continues dharna over CBI issue after a short break early morning. West Bengal CM began the 'Save the Constitution' dharna last night. #Kolkata pic.twitter.com/DBoS0GC1MJ
— ANI (@ANI) February 4, 2019
सीबीआय पथक शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्यांच्या तपासात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी आले होते. या प्रकरणी खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची पाठराखण करत त्यांच्यासाठी रात्रीच धरणे आंदोलनाला बसल्या. या प्रकरणानंतर ममता बॅनर्जी राजीव कुमार यांच्या निवासस्थानी गेल्या त्यानंतर कोलकाताच्या मध्यवर्ती मेट्रो सारणी भागात त्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. राजीव कुमारदेखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
पोलीस आयुक्त राजीव कुमार यांचा अल्प परिचय
कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार हे ममता बॅनर्जी यांचे विश्वसनीय मानले जातात. राजीव कूम हे १९८९ च्या बॅचमधील पश्चिम बंगाल कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते कोलकाता पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख होते. ते शारदा आणि रोझ व्हॅली चिट फंड या घोटाळ्यांचे तपास अधिकारी होते. या दोन्ही घोटाळ्यातील महत्त्वपूर्ण फाईल्स कथित स्वरूपात गहाळ झाल्याने सीबीआयने राजीव कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना या घोटाळ्यांच्या तपासकार्यात मदत करण्यास सांगितले होते. मात्र, त्यापैकी कोणीही तसे केले नाही.
The highest levels of the BJP leadership are doing the worst kind of political vendetta. Not only are political parties their targets, they are misusing power
to take control of the police and destroy all institutions. We condemn this 1/2— Mamata Banerjee (@MamataOfficial) February 3, 2019
राजीव कुमार हे जगातील सर्वोत्तम अधिकारी
राजीव कुमार हे जगातील सर्वोत्तम अधिकारी आहेत. त्यांचा प्रामाणिकपणा निर्विवाद आहे. ते 24 तास प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाहीत, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे. भाजपवर टीका करत त्यांच्याकडून अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांच्याप्रमाणे केंद्राची ही मनमानी चालवून घेतली जाणार नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
The Kolkata Police Commissioner is among the best in the world. His integrity, bravery and honesty are unquestioned. He is working 24×7, and was on leave for only one day recently. When you spread lies, the lies
will always remain lies 2/2— Mamata Banerjee (@MamataOfficial) February 3, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.