HW News Marathi
राजकारण

रात्रभर यूट्यूबवर व्हिडिओ बघतात, सकाळी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणतात !

मुंबई | सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष एकमेकांवर टीका, आरोप करण्यात मग्न आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सध्या चांगला वक्ता नाही. त्यामुळे त्यांनी इंजिनच भाड्याने घेतले आहे. परंतु, इंजिन हे नुसते तोंडाच्या वाफेवर चालू शकत नाही. त्यासाठी ताकद लागते. रात्रभर यूट्यूबवर व्हिडिओ बघतात आणि सकाळी लाव रे तो व्हिडिओ म्हणतात”, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. ते गुरुवारी (२५ एप्रिल) डोंबिवलीतील प्रचार सभेत बोलत होते.

“काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा आहे”, अशीही टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. डोंबिवलीतील या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. “राहुल गांधी, शरद पवार यांची भाषणे म्हणजे निव्वळ मनोरंजन असते. ज्याप्रमाणे टी.व्हीवर मालिका सुरु होण्यापूर्वी मालिकेतील संवाद आणि पात्र काल्पनिक आहेत असे लिहून येते. त्याचप्रमाणे आता वृत्तवाहिन्या देखील या राजकीय नेत्यांच्या भाषणांपूर्वी अशाच प्रकारचा मजकूर छापतील”, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ?

News Desk

अजित पवार अन् शरद पवार आज बारामतीत, कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी होणार चर्चा?

swarit

न्यायालयाच्या निर्णयानुसार किंवा कायद्याद्वारे राम मंदिर व्हावे !

swarit