HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

‘नमो’ टीव्हीच्या प्रसारणाविरोधात काँग्रेस-आपने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

नवी दिल्ली | “निवडणूक आचारसंहिता लागू असताना कोणत्याही राजकीय पक्षाची स्वत: ची वृत्तवाहिनी असण्याची गरज काय ?”, असा सवाल करत काँग्रेस आणि ‘आप’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारासाठी ‘नमो टीव्ही’चा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला होता. याबाबत काँग्रेस आणि ‘आप’ने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला २४ तासांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

“निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांना एकसारखी वागणूक मिळणे आवश्यक आहे. निवडणूक काळात कोणत्याही राजकीय पक्षासाठी सरकारी प्रसारण सेवेचा वापर होऊ नये. ‘नमो’ टीव्हीचा वापर राजकीय प्रचारासाठी करण्यात येत असल्याने निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे निवडणुका होण्यासाठी या वाहिनीच्या प्रसारणावर बंदी घालावी”, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वातील एका पॅनलने निवडणूक आयोगाकडे केली.

Related posts

मोहम्मद शमी यांची पत्नी हसीन जहाँ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Gauri Tilekar

आता डान्सबारमध्ये प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र बंधनकारक ?

News Desk

मायावतींचा जेडीएसला काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा सल्ला

News Desk