HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसची नववी उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील ४ उमेदवारांचा समावेश

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून रविवारी (२४ मार्च) उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या नवव्या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील एकूण १० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ४ उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अकोल्यामधून हिदायद पटेल, रामटेकमधून किशोर गजभिये, चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर, हिंगोलीमधून सुभाष वानखेडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Related posts

पूनम महाजन यांनी चूक मान्य करावी, अन्यथा त्यांच्या प्रचारसभेत युवासेना सहभागी होणार नाही !

News Desk

चोराच्या उलट्या बोंबा

अपर्णा गोतपागर

EVMHacking : मी खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो !

News Desk