HW News Marathi
राजकारण

काँग्रेसची सातवी यादी जाहीर, जालन्यातून विलास औताड यांना उमेदवारी

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी (२२ मार्च) रात्री उशिरा आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या सातव्या यादीत छत्तीसगडमधील ४, जम्मू काश्मीरमधील ३, ओडिशामधील २, तामिळनाडूमधील ८, तेलंगाणामधील १, त्रिपुरामधील २, उत्तर प्रदेशमधील ९ आणि पुदुच्चेरीमधील १ अशा एकूण ३५ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत चंद्रपूर, जालना, औरंगाबाद, भिवंडी आणि लातूर येथील काँग्रेस उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

काँग्रेसचे विलास औताड यांना जालना मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि विलास औताड यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे काँग्रेसकडून उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर हे फतेहपूर सिकरी येथून तर रेणुका चौधरी या तेलंगाणामधील खम्मम मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

काँग्रेसच्या सातव्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे

उमेदवारांची नावे मतदारसंघ

विनायक बांगडे चंद्रपूर

विलास औताडे जालना

सुभाष झांबड औरंगाबाद

सुरेश टावरे भिवंडी

मच्छिंद्रनाथ कामंत लातूर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.भागवतांनी सर्वांना फसवले | प्रकाश आंबेडकर

News Desk

नायर हॉस्पिटलसमोर डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबियांकडून निदर्शने

News Desk

“लोकशाहीला काही मालक निर्माण झाले”, राऊतांचा भाजपला टोला

Aprna