HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काश्मीरमधील मतदान केंद्रात एव्हीएमवरील काँग्रेसचे बटण दाबलेच जात नाही !

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील मतदान केंद्रातील एव्हीएमचे काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटण दाबले जात नसल्याचे काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुला यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडीओ जोडला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ईव्हीएमवरील एक बटण दाबले जात नसल्याचे सांगत आहे. ‘हाताचे’ बटण दाबले जात नसल्याचे ही व्यक्ती म्हणत आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून जम्मू-काश्मीरमधील ईव्हीएममध्ये झालेल्या छेडछाडी प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे या तांत्रिक बिघाडामुळे मतदार देखील नाराज झाले आहेत. केवळ जम्मू-काश्मीरचा नव्हे तर आंध्र प्रदेशमध्ये देखील १०० ईव्हीएम बिघडल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भात देखील अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे.

देशभरात आज एकूण २० राज्यातील ९१ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडत आहे. देशात पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघांसह उत्तर प्रदेशमधील ८, बिहारमधील ४, आसाम आणि महाराष्ट्रामधील ७, ओडिशातील ४ आणि पश्चिम बंगालच्या २ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Related posts

राहुल गांधींनी घेतली दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांची भेट

News Desk

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, या २० नावांचा समावेश

News Desk

आश्वासनांचे किती ‘फुगे’ फुटणार?, ठाकरेंचा सरकारला सवाल

News Desk