HW News Marathi
राजकारण

सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस घेणार राज्यपालांची भेट

नवी मुंबई | मध्य प्रदेशात काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या असून मायावतीने पाठिंबा दिल्याने सत्ता स्थापनेचा काँगेसचा मार्ग मोकळा झाला आहे. जनतेने काँग्रेसला भरभरून मते दिल्याने काँग्रेसच्या कधी नव्हे ते ११४ जागा निवडून आल्या आहेत.

आता मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दुपारी १२ वाजता काँग्रेसला भेटण्यास बोलावले असून, काँग्रेस या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.काँग्रेस नेत्यांनी काल(१२ डिसेंबर) रात्रीच आनंदीबेन पटेल यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मध्य प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेण्यासाठी कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा हे काँग्रेसचे शिष्टमंडळ जाणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या असून, बहुमतापासून काँग्रेस फक्त दोन जाग्यांची गरज होती. परंतु मायावतींच्या बसपाच्या मध्य प्रदेशमध्ये दोन जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे मायावतींच्या पाठिंब्याने काँग्रेसला बहुमताएवढे संख्याबळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे मायावती या निवडणुकीत किंगमेकर ठरली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इव्हीएम मशीनचा गैरवापर होतोय, नवाब मलिकांचा आरोप  

News Desk

RamMandir : नीलम गोऱ्हेंचे पुण्यातून श्रीरामांना साकडे

News Desk

सांगली, जळगावच्या महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर

News Desk