HW News Marathi
राजकारण

‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावरून काँग्रेसमध्ये मतभेद ?

मुंबई | ‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी (१९ जून) देशातील सर्वपक्षीय प्रमुखांसोबत बैठक पार पडली. मात्र, ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला बहुतेक विरोधी पक्षांचा नकार असल्याचे चित्र आहे. त्याचमुळे, अनेकांनी या बैठकीस येण्यासही नकार दिला. काँग्रेसकडून देखील या प्रस्तावाला विरोध करण्यात आला असला तरी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मात्र याबाबतीत पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेतली आहे. पक्षाचा जरी विरोध असला तरीही मिलिंद देवरा यांनी मात्र या प्रस्तावाला समर्थन दर्शविले आहे.

“देशात १९६७ साली देखील ही अशा प्रकारची निवडणूक झाली होती, हे आपण विसरता काम नये. या प्रस्तावाला पाठिंबा मिळविण्यासाठी सरकारला प्रयत्न करावेच लागतील. राजकीय पक्षांमध्ये याबाबत असलेली संशयाची भावना नष्ट करून सरकारला यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. त्यासाठी सरकारला तज्ज्ञांची मते जाणून घेणे देखील आवश्यक आहे”, असे मिलिंद देवरा म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘एक देश एक निवडणूक’ हा मुद्दा चर्चेत आहे. याच, विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली होती. मात्र, अनेक विरोधी पक्षांनी ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना नाकारली आहे. मात्र, या बैठकीस उपस्थित राहण्यास काही पक्षांच्या प्रमुखांनी नकार दिला तर काही पक्षप्रमुखांनी स्वतः उपस्थित न राहता आपला प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अशा अनेक पक्षाध्यक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात जाणार

Aprna

महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना कधीही मिळाली नसेल इतकी मदत युती सरकारने केली !

News Desk

गोव्यात ४० फुटांच्या आकाशकंदीलाची चर्चा

swarit