HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसची आठवी यादी जाहीर, नांदेडमधून अशोक चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने काल (२३ मार्च) मध्यरात्री आठवी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या ६ राज्यातील ३८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधून पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

अशोक चव्हाणांना नांदेडमधून लढण्याचे आदेश पक्षाध्यक्षांनी दिले आहेत. याचबरोबर या यादीत मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्ग्यातून तर दिग्विजय सिंह भोपाळमधून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. देशात २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण विक्रमी मतांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

काँग्रेसच्या उमेदवार नावे

 • नंदुरबार – के. सी. पडवी
 • धुळे – कुणाल रोहिदास पाटील
 • वर्धा – चारुलता टोकस
 • मुंबई दक्षिण मध्य – एकनाथ गायकवाड
 • यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे
 • शिर्डी- भाऊसाहेब कांबळे
 • रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नवीनचंद्र बांदिवडेकर
 • नागपूर – नाना पटोले
 • सोलापूर – सुशीलकुमार शिंदे
 • मुंबई उत्तर-मध्य – प्रिया दत्त
 • मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा
 • गडचिरोली-चिमूर – डॉ. नामदेव उसेंडी
 • चंद्रपूर- विनायक बांगडे
 • जालना- विलास औताडे
 • औरंगाबाद- सुभाष झांबड
 • भिवंडी – सुरेश टावरे
 • लातूर- मच्छिंद्र कामनात
 • नांदेड- अशोक चव्हाण

Related posts

ते पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत यासाठी प्रयत्न करेन पण तिरस्कार करणार नाही !

News Desk

#MarathaReservation : उच्च न्यायालयाच्या आवारात अॅड. सदावर्ते यांच्यावर हल्ला

News Desk

मला आणि प्रणितीला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर, सुशीलकुमार यांचा खळबळजनक खुलासा

News Desk