मुंबई | काँग्रेसने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीतकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातयांच्यासह 51 नावांचा समावेश आहे. काँग्रेस आपली पहिली यादी 20 सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचं आधी म्हटलं जात होतं. त्यानंतर 21 तारखेला विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या.आता पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
The Congress Central Election Committee announces the first list of candidates for the ensuing elections to the Legislative Assembly of Maharashtra pic.twitter.com/LUruU7UNWB
— Congress (@INCIndia) September 29, 2019
विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मवाटप केल्यानंतर आता काँगेसने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 51 उमेदवारांची यादी जाहीर केली. लोकसभा निवडणुकीला नांदेडमध्ये पराभवाचा धक्का बसलेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवणार आहेत अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून उमेदवारी देण्यातआली आहे. नागपूर उत्तर येथून नितीन राऊत यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. काँग्रेसने सोलापूर मध्य येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहेतर सुरेश बाळू धानोकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोळकर यांना वरोरा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.