नवी दिल्ली | प्रियांका गांधी यांची आज (२३ जानेवारी) पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर भाजपने काँग्रेसच्या या निर्णयावर खोचक शब्दात टीका केली आहे. “काँग्रेसने हे मान्य केले की, राहुल गांधी नापास झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसने प्रियांका गांधींना राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, काँग्रेसच्या दृष्टीने गांधी घराणे हे कुटुंबालाच पक्ष मानते, अशा शब्दात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेवर टीकास्त्र सोडले. पात्रा पुढे असे देखील म्हणाले की, भाजप ‘पक्षालाच’ आपले ‘कुटुंब’ मानतो.
Sambit Patra, BJP on #PriyankaGandhiVadra appointed Congress General Secretary for East UP: Expected, to promote dynasty is what Congress is all about. They consider family as the party while BJP considers party as the family. Congress has accepted that Rahul Gandhi Ji has failed pic.twitter.com/NlTdF2LmxS
— ANI (@ANI) January 23, 2019
प्रियांका गांधीसोबत उत्तर प्रदेश पश्चिमचा भार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या खांद्यांवर देण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या उत्तर प्रदेशातील पदाधिकाऱ्यांचाही समावेश असून यात प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या राजकीय खेळीमुळे चांगलच चर्चा रंगू लागल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.