गोवा | “राफेल कराराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेसचा खोटेपणा समोर आल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून तथ्ये तयार करण्याचा एक अत्यंत वाईट प्रयत्न कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. कॅबिनेट किंवा इतर कोणत्याही बैठकीदरम्यान राफेलबाबत अशी कधीही अशी कोणतीही चर्चा कधीच झाली नव्हती”, असे स्पष्टीकरण गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ट्विट करून दिले आहे.
Goa CM Manohar Parrikar tweets, "The audio clip released by the Congress party is a desperate attempt to fabricate facts after their lies were exposed by the recent Supreme Court verdict on Rafale. No such discussion ever came up during Cabinet or any other meeting." (File pic) pic.twitter.com/FoccXSmfP7
— ANI (@ANI) January 2, 2019
राफेल विमान खरेदी करार घोटाळ्याबाबतची सर्व माहिती मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. यासंदर्भातील गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची एक कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. ज्या ऑडिओ किल्पमध्ये “राफेलबाबतची सर्व माहिती पर्रीकरांच्या बेडरुममध्ये आहे” असे अभिजीत राणे यांनी सांगितले आहे.
राफेलबाबतच्या या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर, “काँग्रेसने या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करीत या ऑडिओची लॅबटेस्ट करण्यात यावी”, अशी मागणी अभिजीत राणे यांनी केली आहे. “मी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने मला काँग्रेसकडून लक्ष्य करण्यात येत आहे” असा आरोप देखील अभिजीत यांनी यावेळी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.