HW Marathi
राजकारण

काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही !

नागपूर | “काँग्रेस व विरोधकांकडून अशी अफवा पसरविण्यात येत आहे कि भाजप संविधान बदलणार आहे. परंतु, संविधानाचा मूळ आराखडा कुणीही बदलू शकत नाही. विरोधकांची दुकानदारी बंद झाली म्हणून ते खोटं बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करीत आहेत”, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना सुनावले आहे.

”काँग्रेसकडून केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला गेला. बाबासाहेबांचे नाव घेण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. भाजप संविधान बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा कुणीही बदलू शकत नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची रक्षा करणे ही आमची सर्वात मोठी प्राथमिक जबाबदारी आहे”, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

Related posts

राज्यातील हे ‘स्थगिती सरकार’ फार काळ टिकणार नाही !

News Desk

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का,  माजी पाणीपुरवठा मंत्री शिवसेनेत करणार प्रवेश ?

News Desk

#FightCorona | देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांना व्हेंटीलेटर्स बनविण्याचे केंद्राचे आदेश

News Desk