HW Marathi
राजकारण

मोदींसारखे खोटे बोलण्यास शिकविण्यासाठी काँग्रेसने सुरू केला कोर्स

नवी दिल्ली | मोदींसारखे धडधडीत खोटे बोलायला शिकविण्यासाठी एक नवा कोर्स सुरु करण्यात आल्याचे काँग्रेसकडून म्हटले जात आहे. “केवळ या तीन स्टेप्समध्ये भारतातील सर्वात मोठे खोटारडे असणाऱ्या मोदींना हरवता येईल”, असा आशयाचे ट्विट करत त्यासह एक व्हिडीओ काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणांचाही वापर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २८,४०० लोकांनी पाहिला असून #ModiLies असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

काँग्रेसच्या या व्हिडीओमध्ये मोदींच्या भाषणांचे व्हिडीओ दाखविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, लोकांना खोटी स्वप्ने कशी दाखवावीत, लोकांना आपलेसे कसे करावे, तसे करण्यासाठी लोकांना कशी साद घालावी, अशा अनेक गोष्टी सांगत काँग्रेसने भाजपसह पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची खिल्ली उडवली आहे. हा व्हिडिओच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदीच तुम्हाला खोटे कसे बोलावे याचे मार्गदर्शन करतील असे सांगत, “जेवढ्या वेळा खोटे बोलता येईल तेवढ्या वेळा बोला, नेहमी खोटे बोला, कोणत्याही विषयावर खोटे बोला पण खोटं बोला”, असे सांगतानाचा मोदींना व्हिडिओ जोडण्यात आला आहे.

Related posts

बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

News Desk

मी फक्त रामासोबत आहे !

Shweta Khamkar

…यामुळे शिवरायांच्या पुतळ्याची उंची केली कमी

News Desk